नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद : यंदाही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत साजरा होणार
प्रतिनिधी / बेळगाव
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. त्याचे प्रतिबिंब बाजारपेठेत उमटलेले दिसून आले. यंदा शाळा-कॉलेज बंद असल्याने फक्त सरकारी कार्यालये आणि प्रशासकीय यंत्रणा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांच्या अनुपस्थितीत शिक्षकांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. यंदादेखील परिस्थिती जैसे थे असल्याने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा होणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकानांना आणि शोरुम्सना तिरंगा ध्वजांनी आणि फुग्यांनी सजावट करण्यात येते. मात्र शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू असल्याने शोरुम्सना करण्यात येणारी सजावट दिसणार नाही. शाळा, कॉलेज आणि विकेंड कर्फ्यूने विपेत्यांच्या सिझनवर पाणी फेरले आहे. सरकारच्या निर्देशानुसार सर्व दुकानदारांनी प्लॉस्टिक ध्वजांऐवजी कापडी ध्वज विक्रीस ठेवले आहेत. मात्र, कोरोनामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे विपेत्यांना नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
दरवषी स्वातंत्र्यदिनानिमित्त गणपत गल्ली, मारुती गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस, समादेवी गल्लीमध्ये तिरंगा ध्वज, बॅच, बॅण्ड, स्टिकर्स घेऊन विपेते बसलेले असतात. मात्र, यंदा नागरिकांचाही कमी प्रतिसाद असल्याने बाजारपेठेतील तिरंग्यांच्या स्टॉल्सची संख्या कमी दिसून आली.









