व्यवसाय 39,248 कोटी रुपयांवर- समूह व्यवसाय 53 हजार कोटींवर
मुंबई –
देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड म्हणून ‘अमूल’ची ओळख राहिली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 39,248 कोटी रुपयांचा व्यवसाय अमुलचा झाला आहे. साधारणपणे समूहाचा व्यवसाय हा 53 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती आहे. कंपनीने या कामगिरीमुळे नवा विक्रम नोंदवत इतिहास निर्माण केला आहे.
मागील वर्षात अमूलचा व्यवसाय हा 38,542 कोटी रुपयांवर राहिला होता. यामध्ये कंपनीचे 2025 पर्यंत महसूल दुप्पट करुन 1 लाख कोटी रुपये करण्याचे ध्येय असल्याची माहिती आहे. संपूर्ण जगभरात अमूलची डेअरी जगात दूध उत्पादक म्हणून आठव्या स्थानी आहे. 2012 मध्ये कंपनी 18 व्या स्थानी राहिली होती.
साधारण महामारीत लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे घरांमध्ये डेअरी उत्पादनांची विक्री वाढली आहे. या कारणामुळे कंपनीचा व्यवसाय हा तेजीत राहिला असल्याचे दिसून आले.
प्रतिकारशक्तीसाठी विशेष उत्पादने
कंपनीने कोरोना संकटात प्रतिकार शक्ती निर्माण होणाऱया उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. तसेच अमूलच्या डेअरी उत्पादनांमध्ये यामुळे घसरण राहिली आहे. कारण हॉटेल आणि रेस्टॉरेंट बंद राहिले असल्याने मागणीत घट राहिली आहे.
पॅकबंद उत्पादनांची विक्री तेजीत
कोरोना कालावधीत अमूलच्या पॅकबंद उत्पादनांना मोठी मागणी राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दूध, चीज, बटर आणि आइस्क्रीमचा समावेश होता. यांची अधिकची विक्री झाली आहे. सदरची उत्पादने देशातील मोठय़ा कंपन्या ज्यामध्ये ब्रिटानिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्यासोबत टक्कर देत आहे. वर्षाच्या आधारे या उत्पादनांमध्ये 8.1 टक्क्यांच्या दराने वाढ राहिली आहे.









