न थांबता 5 हजार कि.मी.चा प्रवास, – मणीपूर -कोकण -अरबीसमुद्रमार्गे सोमालीया
केतन पिलणकर/ रत्नागिरी
वीना विश्रांती सलग 5 हजारहून अधिक किलोमीटरचे अंतर कापत अमूर फाल्कन हा मूळ सैबेरियन स्थलांतरीत पक्षी मणिपूरहून सोमालीयामध्ये पोहोचला. त्याचा हा प्रवास कोकण व अरबी समुद्रातून झाल्याचे रेडीओ टॅग ट्रान्समीटरच्या माध्यमातून झालेल्या एका अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.
मुळचा सैबेरीया येथील हा पक्षी लांब पल्याचा प्रवासीपक्षी म्हणून ओळखला जात़ो 170 ते 200 ग्रॅम वजनाचा हा पक्षी कबूतराच्या आकाराचा दिसत़ो खाद्य तसेच अनुकुल वातावरणासाठी हा पक्षी सातत्याने स्थलांतर करत असत़ो या पक्ष्याने मणीपूर ते सोमालीया हे अंतर साडेपाच दिवसामध्ये पार केल्याचे अभ्यासावरून स्पष्ट झाले आह़े दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हा स्थलांतरीत पक्षी मनीपूर येथे विश्रांतीसाठी थांबत़ो मणीपूर परीसरातील डोयांग नदीच्या पाण्याच्या साठय़ामुळे निर्माण झालेला विशाल जलाशय या स्थलांतरीत पक्षाला आकर्षित करत़ो त्यामुळे प्रवासादरम्यान 20 दिवस विश्रांतीसाठी हा पक्षी इथे थांबतो.
मुळात अमूर फाल्कन ही पक्षाची एक दुर्मिळ प्रजाती आह़े त्यातच भर म्हणून मणीपूर येथील स्थानिक या पक्ष्याची मोठय़ा प्रमाणात शिकार करत असल्यामुळे या पक्षाचा अभ्यास व संरक्षण करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानने पुढाकार घेतल़ा बर्डलाईफ इंटरनेशनल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रजाती संरक्षणासाठी पावले उचलली आहेत़ त्यानुसार या प्रजातीचा अभ्यास सुरु करण्यात आला आह़े या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी या पक्ष्याला मणीपूर येथे सौरउर्जेवर चार्ज होणारा 5 ग्रॅम वजनाचा रेडीओ टॅग ट्रान्समीटर लावला. ट्रॉन्समीटरवर उपग्रहांच्या मदतीने लक्ष ठेवत या पक्षांच्या प्रवासाच्या मार्गाचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून हे पक्षी कोणतीही विश्रांती न घेता रात्रंदिवस सुमारे पाच दिवस उड्डाण करत सोमालीयामध्ये पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतात पक्षांवर प्रथमच टॅग ट्रान्समीटरचा वापर
सैबेरीया, चीन व नंतर भारतामधील मणीपूर आणि त्यानंतर कोकण व अरबीसमुदामार्ग सोमालीया असा त्याचा स्थलांतराचा मार्ग आह़े या आधी रेडीओ टॅग ट्रान्समीटर भारतात फक्त वाघ व हत्ती या प्राण्यांवरच लावून या वन्यजीवांचा अभ्यास करण्यात आला होत़ा मात्र पक्षांवर प्रथमच असा प्रयोग करण्यात आल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेने म्हटले आह़े









