नवी दिल्ली
दूध उत्पादन क्षेत्रात कार्यरत कंपनी अमुलने आता आपले नवे उत्पादन मधाच्या रुपात भारतात सादर केले आहे. डेअरी उत्पादनांमध्ये विविध उत्पादने याआधी कंपनीने सादर केली असून काही उत्पादनांना लोकप्रियता लाभली आहे. नव्या अमुल हनी (मध)चे लाँचिंग नुकतेच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर व केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला, कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. अमुल मधाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला भक्कम आधार लाभणार असल्याचे तोमर यांनी यावेळी बोलताना सांगितले.









