नवी दिल्ली
गुजरात सहकारी दुध विपणन संघटनेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱया अमुल कंपनीकडून खाद्य तेल बाजारात सादर केले जाणार असून याकरिताच्या प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगण्यात येते. पहिल्या दोन वर्षामध्ये दुध प्रक्रिया प्रकल्पांसाठी 1000 कोटी रुपये आणि 500 कोटी रुपये नव्या खाद्य तेल निर्मिती प्रकल्पासाठी खर्च केले जाणार आहेत. व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी सांगितले की, चालू अर्थिक वर्षामध्ये कंपनीचा महसूल 12 ते 15 टक्के वाढण्याची शक्यता असून कंपनीच्या ब्रँडेड खाद्य उत्पादनाना मागणी वाढली आहे.
खाद्य तेलाचे कारखाने काही ठिकाणी कार्यरत असून तेथेच बेकरी आणि बटाटय़ावरची प्रक्रिया राबविली जात आहे. पुढील दोन वर्षाच्या काळात 400 ते 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.









