सांताक्रूझमध्ये घरोघरी प्रचारात घेतली आघाडी
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीचे उमेदवार ऍड अमित पालेकर यांनी आपल्या सांताक्रूझ मतदारसंघात घरोघरी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांकडून सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे. ’आप’ने पालेकरांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यामुळे सांताप्रुझच्या मतदारांमधून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
पालेकर हे दुसरे केजरीवाल असतील, असे मत तेथील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पालेकरांसारखा प्रामाणिक, हुशार आणि मेहनती उमेदवार मिळाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. पालेकर यांना बालपणापासून ओळखणाऱया व त्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवणाऱया अनेक महिलांनी त्यांचे स्वागत केले.
आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पालेकरांच्या निवडीला मी पाठिंबा देतो. राजकारणात येण्यापूर्वीच पालेकर सांताक्रूझच्या लोकांची सेवा करण्यात सदैव तत्पर असायचे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेच्या वेळी ते मदतीला पोहोचत होते. कोविडच्या काळात त्यांनी अनेक सेवा केल्या आहेत, आता त्यांचे उद्दिष्ट आहे राज्यातील भ्रष्टाचारमुक्त कारभार, आणि या प्रयत्नात सांता प्रुझचे लोक त्याला साथ देतील, असे मत एका मतदाराने व्यक्त केले.
गेल्या 25 वर्षांपासून सांताप्रुझचा कोणताही विकास झालेला नाही. गावात बाजार प्रकल्पाची ग्र्रामस्थांची दीर्घकालीन मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांताप्रुझला पुरेशी वाहतूक कनेक्टिव्हिटी नाही. प्रमुख बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. पाणी आणि वीजपुरवठा या मूलभूत सुविधांचाही येथे अभाव आहे, असे पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांताप्रुझमध्ये लोकांना बदल हवा आहेत आणि आपण तो बदल घडवून आणणार आहे, असे वचन पालेकर यांनी दिले. आपचे सरकार आल्यास या भागात वीज, पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा लोकांना मिळतील असे असे आश्वासनही पालेकर यांनी दिले.









