पणजी / प्रतिनिधी
पंजाब नंतर आम आदमी पक्षाने गोव्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची औपचारिक घोषणा केली आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पणजी येथे अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली.
अमित पालेकर हे भंडारी समाजाचे नेतृत्व करतात. हा समाज गोव्यात ३५ ते ४० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात असून ही आजपर्यंत या समाजाला फक्त एकदाच नेतृत्व मिळाल्याने भंडारी समाज अद्याप सर्वांगाने उपेक्षित राहील्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
पालेकर हे पेशाने वकील असून आजपर्यंत राजकारणात समाविष्ट झालेली नाहीत. मात्र समाजकारणात ते सक्रिय आहेत.पालेकर हे एका सामान्य कुटुंबातील असून एक यशस्वी वकील असून त्यांनी ओल्ड गोवा संघर्षासाठी सक्रियरीत्या सहभाग नोंदवला आहे.
गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी गोव्याचा कोपरान् कोपरा फिरला असून गोव्यातील सर्व समाजाला युवकांना एकत्र घेत नेतृत्व करणार्या व्यक्तीच्या ते शोधात होते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांना भ्रष्टाचारमुक्त आणि उच्चशिक्षित व्यक्तीचा शोध होता तो पूर्ण झाला अमित पालेकर यांच्या निवडीने पूर्ण झाला आहे.
अमित पालेकर यांच्या मातोश्रीनी दैनिक तरुण भारतशी साधला संवाद
पालेकर यांच्या मातोश्री ज्योती पालेकर यांनी दैनिक तरुण भारतशी संवाद साधला यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाने एका उपेक्षित घटकातील सामान्य मुलाला संधी दिली असून तो गोव्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते यशस्वी ठरतील असे ही त्यांनी यावेळी सांगितले.