प्रतिनिधी / कोल्हापूर
विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा मंगळवारी (23 रोजी) डमी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा.जयंत पाटील, स्वरूप महाडिक, जि.प.सदस्य राहूल आवाडे, प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, डॉ. नीता माने, हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाठ, मलकापूरचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, पन्हाळा नगराध्यक्षा रूपाली धडेल, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके आदी उपस्थित होते.