ओटवणे / प्रतिनिधी:
वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर गावडेवाडी येथील रहिवाशी सौ प्रभावती सदाशिव गावडे (७६) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी सैनिक सदाशिव गावडे यांच्या त्या पत्नी होत तर सावंतवाडी येथील अन्नपूर्णा एजन्सी या फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्सचे पार्टनर तसेच इन्सुली येथील साई मेडिकलचे मालक अमर गावडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव संतोष राणे, श्रीराम गावडे, सचिन मुळीक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावडे कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









