ऑनलाईन टीम / अमरावती :
औरंगाबादनंतर आता अमरावतीतही ‘सारी’ या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अमरावतीत या आजाराचे 22 रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नवाल म्हणाले, ‘सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ असे या आजाराचे नाव असून, त्याची लक्षणे कोरोनासारखी आहेत. सर्दी, ताप, छातीत दुखणे, अशक्तपणा, न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास ‘सारी’ आजारात जाणवतो. अमरावतीत असे 22 रुग्ण आढळले आहेत. त्यांची प्रकृती साधारण आहे. त्यांची नोंद नॉन कोविड -19 सिग्नोमॅटीकमध्ये करण्यात आली असून, त्यांच्या उपचाराची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी सारी या आजाराचे औरंगाबादेत 97 रुग्ण आढळून आले असून, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग पाळून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.








