प्रतिनिधी / वाई
वेडाच्या भरात कोणास काहीही न सांगता निघून गेलेल्या अनुसया किसन साबळे (वय 65, रा.अभेपुरी) यांचा मृतदेह दि.1रोजी सकाळी गावच्या शिवारतल्या विहिरीत आढळून आल्याची खबर बाळकृष्ण मांढरे यांनी वाई पोलिसांना दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बाळकृष्ण मांढरे यांनी दिलेल्या खबरेनुसार त्यांची आत्या अनुसया साबळे यांना वेडाचे झटके येत होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या न सांगता निघून जायच्या अन् परत यायच्या. दि.19रोजी सायंकाळी 5.30 वाजता कोणास काही न सांगता त्या निघून गेल्या.
दि.24रोजी वाई पोलिसात त्या हरवल्याची खबर देण्यात आली. दि.25ते दि.30 या दरम्यान शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. दि.1रोजी सकाळी सोयाबीन काढायला गडशिंग नावाच्या शेतात त्यांच्या मुलासमवेत गेले होते. त्यावेळी तेथे मानसिंग भिलारे हे आले आणि त्यांनी सांगितले की विहिरीत महिलेचा मृतदेह आहे. म्हणून मग जाऊन पाहिले असता अंगात साडी व पेहराव तसाच असल्याने अनुसया साबळे याच असल्याची ओळख पटली. वेडाच्या भरात विहिरीत उडी टाकून बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी पवार तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









