प्रतिनिधी / कोल्हापूर
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यायची इच्छा आहे. परंतू सीईटीची नोंदणी सध्या बंद झालेली आहे. त्यामुळे सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करून किमान पाच दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.
परंतू या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे . परंतू यापुर्वी नोंदणी न केल्याने संबंधीत विद्यार्थी सीईटी परीक्षा देवू शकत नाहीत. 15 जुलै रोजी ही नोंदणी बंद करण्यात आली आहे तरीही बारावीच्या निकालानंतर अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क साधून नोंदणीसाठी पुन्हा लिंक सुरू करा, अशी मागणी केली आहे. सीईटी परीक्षेची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने सीईटीच्या नोंदणीसाठी पुन्हा लिंक ओपन करावी. विद्यार्थ्यांच्या मागणीचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सीईटी नोंदणीसाठी लिंक सुरू करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









