टीमलिज डिजिटलची माहिती : 4 कोटीहून अधिक जणांना रोजगार प्राप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येणाऱया काळामध्ये अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य क्षेत्रामध्ये 1 कोटी 20 लाखाहून अधिकच्या नोकऱया उपलब्ध होणार असल्याची माहिती भरती प्रक्रियेशी संबंधित फर्म टीमलिज डिजिटल यांनी दिली आहे.
सदरच्या वरील क्षेत्रांमध्ये 2026 पर्यंत दुप्पट तज्ञांची गरज लागणार आहे. वर्षाच्या आधारावर पाहता 25 ते 27 टक्के इतकी रोजगार संधींची संख्या वरील क्षेत्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे. पीएलआय योजना आणि विदेशातून होणारी गुंतवणूक वाढल्याने अभियांत्रिकी, दूरसंचार व आरोग्य क्षेत्रामध्ये आगामी काळात कुशल तज्ञांची मागणी वाढणार आहे. पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये जीडीपीमध्ये या क्षेत्रांचा वाटा वाढलेला असणार आहे.









