प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कुठल्याही विभागात काम करायचे म्हणले की डोकेदुखी ठरते.त्यात एखाद्या अधिकायाला बीपी आणि शूगर असली की आणखी त्रास होतो.मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा कार्यालयात अभियंता म्हणून सेवा निवृत्त झालेले संजय गायकवाड यांनी तर सेवा निवृत्तीचा सत्कार सोहळा न घेता शेवटच्या दिवशी काम करून लोकसेवक असल्याचे दाखवून दिले.त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
नुकतेच सेवा निवृत्त झालेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता संजय गायकवाड यांच्या नोकरीची सुरवात सोलापूर जिल्हा परिषेदेत झाली. उल्हासनगर महानगर पालिकेत काम केले आहे. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती कामांची आवड व अनुभव असल्याने सर्वच ठिकाणी त्यांचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत.सातारा येथे बदली होऊन आल्यावर मध्ये सातारा, महाबळेश्वर व पाचगणी पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती, अमृत पाणी पुरवठा व ड्रेनेज, नगरोत्थान ड्रेनेज, एनआरडब्लूडीपी, जलस्वराज2 या सर्व प्रकारची कामे सातारा विभागामध्ये सुरू आहेत. तसेच वेगवेगळ्या नगर पालिकांची तांत्रिक मान्यता देणेचे कामही या विभागाकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे नियमावलीतील परिशिष्ट, बी1 निविदेतील नित्यनिगडित खंडाच्या त्यांनी चांगले काम केले आहे.केंद्र शासनाने हर घर नल से जल ही संकल्पना राबविल्या नंतर साहेबानी जास्तीतजास्त कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला. या वर्षी महापुरात एक ही दिवस सातारा शहराचा पाणी पुरवठा बंद पडू दिला नाही. तसेच लॉक डाउन कालावधीत सातारा शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित ठेवणेसाठी जॅकवेल, sंऊझ्, तसेच वेगवेगळ्या भागात नियोजन करणेसाठी त्यांना दररोज 60 ते 70 किलोमीटर प्रवास करायला लागायचा. तथापि या संपूर्ण लॉक डाउन कालावधीत सातारा शहरातली तसेच महाबळेश्वर पाचगणी येथील तक्रार येऊ दिली नाही.योगासन व आयुर्वेदाचा ही त्यांचा अभ्यास असल्याने आपल्या सर्व व्याधीवर त्यांनी मात केली आहे. 400 च्या वर शुगर आणि 200 च्या वर बीपी असतानाही त्यांनी कधी रजा काढून विश्रांती घेतली नाही.त्यांनी सेवा निवृत्तीच्या दिवशीही काम केल्याने काही जणांच्या भावना उचंबळून आल्या.








