ऑनलाईन टीम/औरंगाबाद
दबंग गर्ल बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत गुलाब जाधव असे या आरोपीचे नाव आहे. शशिकांत याने सोनाक्षीसह बॉलिवूडच्या इतर कलाकारांबाबतही वादग्रस्त कमेंट केली होती. याप्रकरणी सोनाक्षीने मुंबई पोलिसांकडे 7 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती.
अभिनेत्री सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर महिला सुरक्षा, सायबर बुलिंग या विषयांशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमार्फत तिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस’ अशी मोहिम सुरु केली. मात्र, तिच्या व्हिडीओवर शशिकांत जाधवने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
सोनाक्षीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु करत आरोपी शशिकांत जाधवविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांचा याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर पोलिसांचे आभार मानले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









