माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला : रागिणी द्विवेदी
बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी १५० दिवसानंतर शनिवारी तुरुंगातून बाहेर आल्या. रागिणीला हाय प्रोफाइल ड्रग प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रागिणीने ट्विट करत माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला असल्याचे म्हंटले आहे.
रागिणीने नवीन वर्षात तिचा कायदा आणि कायदेशीर व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे म्हणत तिने आभार मानले आहेत.
रागिणीने मला खात्री आहे की प्रत्येक नागरिकाप्रमाणेच भारतीय घटनेनुसार माझे हक्क नेहमीच संरक्षित केले जातील. सर्वांच्या आशीर्वादाने मी या वाईटावर विजय मिळविला आहे. माझ्या सर्व प्रयत्नांमध्ये विजयी होण्यासाठी तसेच मला माझे सामर्थ्य माझे कुटुंब, माझे चाहते आणि समर्थक आहेत जे मला नेहमी सामर्थ्य देतात, असे त्या म्हणाल्या.
रागिणीने आपण निर्दोष असल्याचे सांगत चित्रपटसृष्टीतील तिला चांगले माहित आहे, कारण एका दशकापेक्षा जास्त काळापासून ती त्यांच्याबरोबर काम करत आहे. शनिवारी न्यायालयात तिच्या सुनावणीला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, याव्यवसायातील माझे १२ वर्षांचे कार्य सर्व काही सांगून जाते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अॅपेक्स कोर्टाने तिला जामीन मंजूर केला आणि सोमवारी ती औपचारिकरित्या तुरूंगातून बाहेर आली, तेव्हापासून रागिणी आपल्या कुटुंबियांसह आणि जवळच्या साथीदारांसमवेत मंदिर दर्शनासाठी जात आहे.
रागिणीला ४ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. ही अभिनेत्री १४ सप्टेंबरपर्यंत बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलीस (सीसीबी) कोठडीत होती आणि त्यानंतर १५ सप्टेंबरला त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कॉटनपेट ड्रग्स प्रकरणात ती दुसर्या क्रमांकाची आरोपी आहे. दरम्यान याप्रकरणात रागिणीनीबरोबरच तिची सहकारी अभिनेत्री संजना गलराणीसह डझनभरहून अधिक आरोपी आहेत.









