ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता ‘अग्गं बाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवेदिता सराफ यांची 15 सप्टेंबरला कोरोनाची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या त्यांंच्यात सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केले आहे. त्यांनी वेळीच स्वतःची चाचणी करून घेतली आणि तेव्हा पासून काम थांबवले आहे.
दरम्यान, मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासोबतच निवेदिता यांच्या घरात देखील अभिनेते अशोक सराफ आणि अन्य सदस्यांची कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.









