प्रतिनिधी / सांगली
सांगली स्पोर्टस् फाऊंडेशनची राष्ट्रीय धावपटू रसिका माळी ही अभिनेत्री तापसी पन्नू सोबत चमकणार आहे. गुजरातमधील कच्छ येथील रश्मी नामक धावपटूच्या संघर्षावर आधारीत हा चित्रपट असून सध्या त्याचे चित्रीकरण सुरू झाले आहे. यामध्ये सांगलीच्या रसिकाला संधी मिळाली आहे.
गुजरातची प्रसिद्ध खेळाडू रश्मी ही आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकली होती. तिला तिथे “रॉकेट’ असे संबोधले जाते. तिच्या संघर्षावर आधारीत “रश्मी रॉकेट’ हा चित्रपट आहे. रश्मीची भूमिका तापसी पन्नू साकारत आहे. याचे दिग्दर्शक आकाश खुराना असून, या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे.
या चित्रपटात सांगलीच्या रसिका माळी हिला संधी मिळाली आहे. ती एन.डी. पाटील कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम या वर्गात शिकत असून सांगली स्पोर्टस् फाऊंडेशनमध्ये ती नियमित सराव करते.
याबद्दल संघटनेचे अध्यक्ष मकरंद चितळे, प्रमोद शिंदे, प्रशिक्षक एस. एल. पाटील यांनी तिला शुभेछा दिल्या. तिला वडील रविंद्र माळी, चुलते शाहीर देवानंद माळी, संघटनेचे संजय परमणे, राजू बावडेकर आदींचे नेहमीच प्रोत्साहन लाभते आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








