- सोशल मीडियावर दिली माहिती
ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना विषाणू अक्षरशः थैमान घालत आहे. सामान्य नागरिकांनपासून खेळाडू, राजकारणी, बॉलीवूड कलाकार अनेकांना कोरोनाने आपले शिकार बनवले आहे. त्यातच आता बॉलीवूड क्विन कंगना राणावतला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मी घरामध्ये क्वारंटाइन झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः ची काळजी घेत आहे. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून मला अशक्तपणा जाणवत होता. माझ्या डोळ्यांची आग होत होती. मला हिमाचलला जाण्यापूर्वी टेस्ट करायची होती. त्याप्रमाणे मी काल टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या घरामध्येच क्वारंटाइन आहे.
पुढे तिने म्हटले की, आता मला माहिती आहे आणि लवकरच मी यातून बरी होईन. आपण या विषाणूचा न घाबरता सामना केला तर तो देखील आपल्याला घाबरवणार नाही, असेही तिने यावेळी सांगितले आहे.









