ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई बीएमसीने तूर्तास थांबवली आहे. तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेेेले महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे. या तोडकामा विरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडकाम तुर्तास थांबवले आहे.

कार्यालयातील तळमजल्यावर तोडकाम केले. तसेच कार्यालयाची संरक्षक भिंत आणि कंपाऊंडवर जेसीबी चालवण्यात आला. यानंतर कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी तिथे पोहोचले. त्यानंतर ही कारवाई काही काळ थांबवण्यात आली.
दरम्यान, आता उद्या दुपारी 3 वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी मुंबई महपालिकेकडून सकाळी 10.30 वाजता कंगनाच्या पाली हिल कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जात होता. काल या संदर्भात पालिकेकडून नोटीसही पाठवण्यात आली होती.

कंगना ने ट्विट करत आपल्या घरात कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही असे म्हटले आहे.









