महिला व बाल विकासच्या अधिकारी रोहिणी ढवळे यांची घेतली भेट, कार्याची घेतली विभागाच्या कार्याची घेतली माहिती
सातारा/प्रतिनिधी
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राणू अक्का फेम अभिनेत्री अश्विनी महागंडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेमार्फत गोरगरीब महिला, युवती यांच्या प्रती सामाजिक कार्य राज्यात सुरू आहे.सातारा जिल्ह्यात कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांनी नुकतीच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून जिल्ह्याची माहिती जाणून घेत त्यांनी चर्चा केली.
वाई तालुक्यातील पसरणी येथील अश्विनी महागंडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत राज्यात सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यांनी या प्रतिष्ठानच्यावतीने लातूर येथील आई वडील नसलेल्या रेणुका गुंडरे हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.तसेच कर्जाच्या पायात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची लातूर जिल्ह्यातील हांगर्गा येथील भाग्यश्री पवार हिला दत्तक घेतले आहे.असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राज्यात सुरू केले आहेत.सातारा जिल्ह्यात सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी नुकतीच महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची भेट घेऊन चर्चा केली.त्या जिल्ह्यात कार्य सुरू करणार असल्याचे समजते.









