ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू अस्लम खान यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अस्लम खान आणि त्यांचे दुसरे बंधू एहसान खान यांना मागील आठ दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर दोघांनाही लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अस्लम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित काही आजार होते. कोरोनामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. अखेर आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
एहसान खान यांच्यावर सध्या याच रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू आहेत. ते 90 वर्षांचे आहेत.









