सांगली प्रतिनिधी
नाटक या माध्यमाचा वापर करून समाज प्रबोधन आणि विचार प्रसार हे उद्दिष्ट बाळगणारे सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आज संवेदना वृद्धसेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी येथील वृद्धांशी आस्थापूर्वक संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी येथील परिचारिका व आया मावश्या यांच्या सेवेबद्दल कौतुकोद्गार काढले. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून आरोग्य संवाद या संकल्पनेवर काम करणाऱ्या अनेक संस्थांशी ते जोडलेले आहेत. संवेदनासाठी ही सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. डॉ दिलीप शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी नामदेव माळी, डॉ नीलम शिंदे इत्यादी उपस्थित होते. आदित्य आपटे व माधुरी कुमरे यांनी संयोजन केले.