ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांतसिंह राजपूत याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत पंचतत्वात विलीन झाला आहे.
34 वर्षीय सुशांत सिंह राजपूत ने रविवारी वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान, सोमवारी सुशांत यांचे वडील आणि चुलत भाऊ पाटणा वरून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतचे पोस्टमोर्टम देखील करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्युने बॉलीवुड देखील हादरून गेले आहे. अनेक सेलिब्रेटींनी सुशांतच्या निधनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमीच परखडपणे आपले मत मानणारी अभिनेत्री कंगना रानौत हिने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर गंभीर आरोप लावले आहेत.
कंगना म्हणते की, स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा आरोप केला आहे. या संदर्भात कंगनाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.









