ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने स्वतः आज सकाळी कोरोना झाल्याची माहिती दिली.

रणवीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे मी सध्या क्वारंटाइनमध्ये आहे.
रणवीरच्या या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रणवीर ‘वो रंगबाज’, ‘मेट्रो पार्क’, ‘बॉम्बर्स हाय’ यांसारख्या सीरिज मध्ये झळकला होता. रंगबाजमधील त्याच्या अभिनयाची चांगलीचं चर्चा झाली होती. सध्या तो ‘मेट्रो 2’मध्ये दिसणार आहे. ही सीरिज Eros now वर स्ट्रीम होणार आहे.









