बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील रस्ते वाहतूक महामंडळाच्या विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी अनधिकृत संप नवव्या दिवशीही सुरू राहिला. कन्नड सुपरस्टार यशने गुरुवारी हा प्रश्न सोडविण्यासाठी शांततेत संवाद साधण्याची मागणी केली. तसेच त्याने कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या खुल्या पत्रामध्ये यशने स्वत: च्या जीवनाचा संदर्भ देऊन तो बस ड्रायव्हरचा मुलगा असल्याचे म्हटले आहे. निषेध व्यक्त करणारे कर्मचारी संघटनांना संबोधित करताना त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, सध्या मागण्यासाठी संपावर उभे असलेले कामगार असो वा जनतेला, विशेषत: मध्यम वर्गाला कमी बसगाड्या चालविण्याने त्रास होत आहे, मला दोन्ही बाजूच्या लोकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. त्यामुळे कर्मचारी आणि सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा असे म्हंटले आहे.
पुढे यशने असा दावा केला की त्याने परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर कर्मचार्यांच्या वेतनाच्या मागणीकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.









