वार्ताहर / अब्दुल लाट
अब्दुल लाट ता. शिरोळ) येथील विद्यमान सरपंच पांडुरंग सिद्राम मोरे-भाट हे मुदतपूर्व टेंडर फोडले प्रकरणामुळे अपात्र ठरले आहेत. सन २०१८ रोजी विविध विकास कामांच्या आलेल्या निवेदांचे लखोटे बेकायदेशीररित्या नागरिकांच्या समोर व ग्रामविकास अधिकारीऱ्यांच्या देखत आपला मनमानी कारभार चालवत फाडला होत्या. तसेच उपस्थित नागरिकांना देखील उद्धट वर्तन करत अपशब्द वापरले होते. एका सुज्ञ नागरिकाने संबंधित सर्व प्रकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. विरोधकांनी झालेल्या प्रकाराबद्दल शासकीय वरिष्ठ अधिकार्यालयात सरपंच पांडुरंग सिद्राम मोरे-भाट यांच्याविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ अन्वये तक्रार दाखल केली होती.
नुकताच सदर याचिकेवर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सदर घटनेची पूर्णपणे चौकशी केली असता अब्दुल लाट ग्रामपंचायतीचे सरपंच दोषी आढळून आल्याने व सरपंचांना याविषयावर यशस्वीरीत्या खुलासा न करता आल्याने त्यांच्यावर आपत्रतेची कारवाई करण्यात आली आहे.सदरचे आपत्रतेचे पत्र अब्दुल लाट ग्रामपंचयातीकडे प्राप्त झाले आहे.अशी माहिती ग्रामविकास अधिकारी डी.आर.कांबळे यांनी दिली.
Previous Articleशाहूवाडी तालुका कंटेन्मेंट झोन जाहीर
Next Article अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सामाजिक बांधिलकी








