संजय खूळ/इचलकरंजी
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील जिनेन्द्र किरण सांगावे यांनी मोटॉक्रॉस स्पर्धेत देशात लक्षवेधी कामगिरी केली आहे. आज चेन्नई येथे पार पडलेल्या 12 ते 19 वयोगटातील टीव्हीएस रुकी ओ एम सी मोटर स्पोर्ट्स मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्वात लहान वय असलेल्या खेड्यातील या मुलांने केलेली चमकदार कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. जिनेन्द्र हा सध्या अब्दुल लाट येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत सातवीमध्ये शिकत आहे.
चेन्नई येथे 12 ते 19 वयोगटाच्या 5 फेरी पैकी पहिल्या फेरीत टिव्हिएस आर टी आर 200 सी सी वन मेक चॅम्पियनशिप मध्ये दोन स्पर्धेत प्रथम तर एमआरएफ नॅशनल चॅम्पियनशिप नोव्हिस क्लासमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. यामध्ये देशातून 40 स्पर्धक सहभागी झाले होते.
जिनेन्द्र यास लहानपणापासूनच मोटरसायकलींचा आवड आहे ऑफ़ रोड स्पर्धेत वयाच्या सात ते दहा वर्षापर्यंत फक्त तीन वर्षात 45 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि इतर स्पर्धांमध्ये पारितोषक जिंकले आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी एमआरएफ मोटॉक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप टायटल घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी एशियन चॅम्पियनशिप ला जाण्याचं स्वप्न जिनेन्द्र ने पाहिला होता. पण दोन्ही वर्षी कोरोनामुळे स्पर्धा होऊ शकल्या नाहीत आणि जिनेन्द्र चे स्वप्न अपुरे राहिले. पण मोटोक्रॉस स्पर्धा यावर्षीही होणार नाहीत असे जाहीर झाल्यानंतर लगेचच मोटर स्पोर्ट चा दुसरा प्रकार सर्किट रेसिंग मध्ये चॅम्पियनशिप साठी ध्येय ठेवले. स्पर्धेला स्वतःची गाडी लागणार होती. वेळ कमी आणि नियोजन खूप मोठी असून देखील मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून स्पर्धेसाठी गाडी घेतले.या गाडीचे रजिस्ट्रेशन चे काम कोल्हापूर आरटीओ अधिकारी राजवर्धन करपे यानी लवकरात लवकर करून दिली. यामुळे त्याला यशापर्यंत पोहोचता आले.
जिनेन्द्रने वयाच्या 12 व्या वर्षात सुरुवातीलाच ऑन रोड स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन 3 पारितोषक मिळवून गावाचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे, शिवाय स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याचे कौतुक होत आहे. जिनेन्द्र यास मोटरस्पोर्ट स्पर्धेमध्ये टी व्ही एस, वेगा हेलमेट्स, मोहिते रेसिंग अकॅडमी आणि राहुल आवडे, निकम यामाहा, त्याचे काका सागर सांगावे सहकार्य करीत आहेत.
Previous Articleराजर्षी शाहू महाराज, दीक्षित गुरूजी, तोफखाने मास्तर!
Next Article मिरजेच्या सतारीवर विश्वविक्रमी झंकार









