खानापुर / वार्ताहर
चोर्ला गोवा राज्य महामार्गावरील कणकुंबी नजिक रात्रीची गस्त घालत असताना खानापूर अबकारी विभागाच्या अधिकाऱयांनी आयशर टँकरमधून गोवा बनावटीच्या चोरटय़ा मद्याची वाहतूक करताना एकाला कारवाई करून अटक केली. अभिलाष आण्णाप्पा मुनोळी रा. गुरुकुल नगर इचलकरंजी असे संशयिताचे नाव आहे.पण सदर आरोपच कोराना पॉझीटीव्ह आल्याने अबकारी खात्याची मात्र झोपच उडाली. या तरुणाला न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर तरुणाला बेळगाव सिविल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.









