प्रतिनिधी/ पणजी
गोवा विद्यापिठाच्या आवाराबाहेर विद्यापिठातील एका अफगाणी विद्यार्थ्यावर चार जणांकडून चाकू हल्ला करण्यात आला. सध्या त्या विद्यार्थ्याची प्रकृती गंभिर असून पोलिसांनी मारेकरुवर कडक कारवाई करण्याची मागणी गोवा विद्यापिठ विद्यार्थी संघटनेने काल पत्रकार परिषदेत केली आहे. सर्व चारही आरोपीवर कडक कारवाई करुन त्या विद्यार्थ्यांला न्याय द्यावा अन्यथा सर्व विद्यापिठाचे विद्यार्थी पोलिस्थानकावर मोर्चा नेणार आहे, असे यावेळी या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
गोवा विद्यापिठात अनेक अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यावर हल्ले झाल्याने आज परदेशातील विद्यार्थी गोवा विद्यापिठात शिक्षण घ्यायला घाबरणार आहे. अशा घटना घडल्याने गोव्याचे नावा गहाण होणार आहे. तो कोणीही असू तो गोवा विद्यापिठाचा विद्यार्थी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचा त्याला पाठींबा आहे. बाहेरील मारेकरुनी त्याच्यावर जीवे मारण्याचा हल्ला केला आहे. पोलिसांनी याची तातडीने दखल घ्यावी तसेच गोवा विद्यापिठाने याची गंभिर दखल घेऊन त्या विद्यार्थ्याला न्याय द्यावा. सध्या गोवा विद्यापिठाचे उपकुलगुरु राज्यबाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही rपण आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असे यावेळी या विद्यार्थ्यांनी सांगितले.
पोलिसानी आम्हाला योग्य न्याय द्यावा तसेच गोवा विद्यापिठाने याची दाखल घ्यावी r अशा घटनामुळे आम्हाला आता गोवा सुरक्षित वाटत नाही. आम्ही अफगाणी rअसल्याने आमच्यावर हल्ले झाला असल्याची शंका आहे. या तिघे जणांना अटक केली आहे आणखी एकटय़ाला अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व सत्य शोधून काढावे, असे यावेळी अफगाणी विद्यार्थी अब्दुल बसिद व मोहम्मद सैफ यांनी सांगितले.









