ऑनलाईन टीम / काबुल :
अभिनेत्री आणि अफगाणिस्तानातील पहिली महिलादिग्दर्शिका सबा सहर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात सबा जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वी सबा आणि त्यांचा अंगरक्षक एका लहान मुलासह घराबाहेर पडले. त्यावेळी कारचा चालकही त्यांच्याबरोबर होता. घरातून बाहेर पडल्यावर काबुल येथील राहत्या घराजवळ चार अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सबा यांनी पती इमाल झाकी यांना फोनवरून याबाबतची माहिती दिली. इमाल यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सबा आणि त्यांचा अंगरक्षक जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबाराच्या घटनेवेळी सबा यांचा चालक लहान मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी गेल्याने दोघे या गोळीबारातून बचावले.