काबुल
अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे देशाची राजधानी आणि जवळपास 16 प्रांतामधील सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठं तसेच शाळा यांना शनिवारपासून किमान दोन आठवडय़ांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. तर काही देशांमध्ये ती सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे विविध देश आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेत असल्याचे वातावरण आहे. अफगाणिस्तानात वेगाने वाढत जाणाऱया कोरोना संसर्गामुळे विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्याचा विचार सरकार करते आहे. आरोग्य मंत्रालयानुसार 6,00,000 पेक्षा अधिकजणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे.









