ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 47 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 11 सैनिकांचाही समावेश आहे. स्फोटात 14 घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेरात प्रांतीय गव्हर्नरच्या प्रवक्त्या जेलानी फरहाद यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,
हेरात शहरातील एका पोलीस मुख्यालयाला लक्ष्य करून शुक्रवारी रात्री हा स्फोट घडवण्यात आला. मात्र, यात 8 निष्पाप लोकांचा बळी गेला, तर काही जण जखमी झाले. 14 घरांचेही नुकसान झाले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही.
तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, हेरातमध्ये झालेल्या स्फोटाचा त्यांच्या संघटनेशी काहीही संबंध नाही.









