ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानच्या काला-ए-नाव शहरात आज सकाळी एका दुकानात झालेल्या बॉम्बस्फोटात 2 जण ठार तर 2 जण जखमी झाले. प्रांतीय कार्यकारी पोलीस प्रमुख शिर एक अलोकोजई यांनी एका वृत्तसंस्थेला या स्फोटाची माहिती दिली.
दरम्यान, शनिवारीही अफगाणिस्तानातील काबुल येथे झालेल्या स्फोटात सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात यापूर्वीही काबूलच्या फुल-ई-खोस्क भागात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटातही काही लोकं मारली गेली होती.









