ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानात काबूलच्या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या स्फोटांमध्ये पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत.
काबुल गृह मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी काबूलमधील जिल्हा 13 मधील दश्त-ए-बार्ची भाग आणि जिल्हा 6 मधील अली जिना रुग्णालयाजवळ हे स्फोट झाले. या स्फोटांमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले तर काही जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. या स्फोटांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.









