ऑनलाईन टीम / काबुल :
काबुलमध्ये दहशतवादी सेल चालवत असलेल्या एका चिनी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून, 10 चिनी हेरांना अटक करण्यात आली आहे. या हेरांनी चीन जगभरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पश्चिम आशियाई देशातील मुत्सद्दी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
चिनी मॉड्यूलच्या पर्दाफाशामुळे चीनला लाज वाटू लागली आहे. आता ते हे प्रकरण लपवण्यासाठी अशरफ गनी सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न चीन करत आहे. अटक करण्यात आलेले हेर चीनच्या गुप्तहेर संस्थेशी आणि राज्य सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित असल्याचे मानले जाते. एनडीएसतर्फे 10 डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांत प्रथमच चिनी नागरिकांना अफगाणिस्तानात हेरगिरी करताना पकडण्यात आले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतल्यामुळे चीन तेथे आपला प्रभाव झपाट्याने वाढवत होता.









