ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज सकाळी झालेल्या कार बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना अफगाणिस्तानचे गृहमंत्री मसूद अंद्राबी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
स्फोटातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खासदार खान मोहम्मद वारडाक यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे.