ऑनलाईन टीम / कॅनबेरा :
चीन आणि जर्मनीनंतर ऑस्ट्रेलियानेही अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डट्टन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पीटर डट्टन म्हणाले, ऑस्ट्रेलियाचे सैन्य जवळपास 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये होते. त्यांना काबूल येथील दूतावासाचे रक्षण तसेच मुत्सद्दी मोहिमेसाठी नेमण्यात आले होते. 38 हजार सैन्य अफगाणिस्तानमध्ये होते. त्यातील 41 जवान शहीद झाले. हवाई सैन्यदलाने 2013 मध्येच अफगाणिस्तान सोडले होते. सध्या केवळ 80 सैन्य अफगाणिस्तानात होते. हे सैन्यही आता माघारी घेण्यात आले आहे.
अफगाणिस्तानातील आमची लष्करी मोहीम अमेरिकेच्या समन्वयाने संपुष्टात आणली आहे, असे डट्टन यांनी जाहीर केले आहे.









