ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
अफगाणिस्तानात वास्तव्यास असलेले 25 भारतीय नागरिक राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) रडारवर आहेत. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएला असा संशय आहे की, अफगाणिस्तानातील हे 25 भारतीय दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित आहेत. हे सर्व जण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेजवळच्या नांगरहार या भागात राहत आहेत. मात्र, त्यातील काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
तपास यंत्रणेने त्यापैकी मुनसिब नामक व्यक्तीची ओळख पटवली आहे. मुनसिब सोशल मीडियावर सक्रिय आहे. NIAला असा संशय आहे की, तो आयएसआयएसशी ऑनलाइन देखील जोडला गेला आहे.









