ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही अनेक नागरिक विमानतळावर गर्दी करत आहेत. अफगाणिस्तानातील अशा भारतीयांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा अर्ज प्रक्रिया जलद करण्यासाठी E-emergency X-Misc visa ची घोषणा केली आहे. या सुविधेअंतर्गत भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवेश करु इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना जलगदगतीने व्हिसा देण्यात येईल.
अफगाणिस्तानाच अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी देशातून सर्वतोपरी मदत केली जात असून, अफगान सेलही सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत कोणालाही मदत हवी असल्यास +919717785379 वर फोन किंवा MEAHelpdeskIndia@gmail.com वर ई मेल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारतीय हवाई दल दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांमधून त्यांना एअरलिफ्ट करत आहे. यामधील एका विमानाने रविवारी रात्री उड्डाण केलं. सोमवारी सकाळी हे विमान 140 भारतीयांना घेऊन ते मायदेशी परतले. तर दुसऱ्या विमानाने काबूल विमानतळावर अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षितेत दिल्लीसाठी उड्डाण केले आहे. या विमानामध्ये 120 जण आहेत. यामध्ये दुतावासाचे कर्मचारी आटीबीपीचे जवान आणि काही माध्यमांचे प्रतिनिधीदेखील आहेत. इतर भारतीयांनाही लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे.