ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानमध्ये आज भूकंपाचे भूकंपाचे धक्के जाणवले. गुरूवारी सकाळी 11 वाजून 22 मिनीटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टल स्केल एवढी होती. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. अफगाणिस्तानच्या बजरकपासून 38 किमी ईशान्य दिशेला हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू बजरकजवळ होता आणि त्याची खोली 92 किमी होती. मात्र, आतापर्यंत भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.









