अबुधाबी / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानने येथील पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा दणका दिला. अफगाणने गुरबाझच्या 87 धावांच्या धमाकेदार खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकात 5 बाद 198 धावा केल्या तर प्रत्युत्तरात तुलनेने अनुभवी झिम्बाब्वेला 7 बाद 150 धावांवर समाधान मानावे लागले. झिम्बाब्वेतर्फे तिनाशेने सर्वाधिक 44 धावा जमवल्या. अफगाणतर्फे रशीद खानने 28 धावात 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान ः 20 षटकात 5-198 (रहमनुल्लाह गुरबाझ 45 चेंडूत 6 चौकार, 7 षटकारांसह 87, असघर अफगाण 38 चेंडूत 55, करिम जनत 22 चेंडूत 26. रिचर्ड, ब्लेसिंग प्रत्येकी 2 बळी).
झिम्बाब्वे ः 20 षटकात 7-150 (तिनाशे कमुन्हुकमे 37 चेंडूत 44, सीन विल्यम्स 20 चेंडूत 22, सिकंदर रझा 14 चेंडूत 22. अवांतर 9. रशीद खान 4 षटकात 3-28, करिम जनत, फरीद अहमद प्रत्येकी 2 बळी).









