प्रतिनिधी / बार्शी
बार्शी नगरपालिकेमार्फत राबविली जाणारी भुयारी गटार योजना ही सध्या अपूर्ण स्थितीत असून तसेच या भुयारी गटारीमुळे रस्ते खोदले आहेत. यामुळे बार्शी शहरातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत, खड्डे पडलेले आहेत या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व अपूर्ण भुयारी गटार पूर्ण व्हावी खराब रस्ते दुरुस्त व्हावे यासाठी बार्शी नगरपालिका समोर धरणे आंदोलन चालू झाले आहे. हे आंदोलन जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय संघटना, समन्वयक व मानवी हक्क आणि कायदे संरक्षणकर्ता सोलापूर जिल्हा समन्वयक मनीष देशपांडे यांनी हे धरणे आंदोलन चालू केले आहे.
यावेळी प्रशासनाला धरणे आंदोलन वेळी पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये मागणी केली आहे की, भारतीय संविधानाने अनुच्छेद 21 नुसार सर्व भारतातील नागरिकांना जीवन जगण्याचा अधिकार व सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे तसेच रस्ता हा नुकताच मान्य केले आहे. की मानवाधिकार सुद्धा आहे. उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्ट यांनीसुद्धा रस्ता हा प्रमुख मानवाधिकार आहे. असे मान्य केले आहे परंतु बार्शी शहरांमध्ये हे भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. मात्र यावेळी गटारीचे काम नियमाप्रमाणे झालेले नाही तसेच हे काम अपूर्ण स्थितीमध्ये आहे. तर या भुयारी गटारीचा ठेकेदार काम अर्धवट सोडून पळून गेला असल्याने सध्या भुयारीचे काम आहे. तसेच भुयारी गटारीमुळे रस्ते खोदले असल्याने रस्त्यावर ती प्रचंड मोठे खड्डे व त्यापासून धूळ निर्मिती होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी तसेच खराब रस्ते त्वरित दुरुस्त व्हावे या मागणीसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन चालू केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनात केलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की भुयारी गटार कामांमध्ये अनियमितता झाली आहे याची चौकशी व्हावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, मंजूर न झालेले रस्ते त्वरित मंजूर करावे, त्याचे रिपेयर मंजूर झालेले रस्ते रस्ता झाला आहे. का याचीही चौकशी करावी, बार्शी रस्त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना नगरपालिकेने पाच लाख रुपये मदत त्वरित द्यावी, बार्शीतील रस्त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तींना दवाखान्यातील खर्च बार्शी नगरपालिकेने त्वरित द्यावा, अपघातांमध्ये ज्यांना अपंगत्व आले आहे त्यांना बार्शी पालिकेतर्फे तीन लाख रुपये मदत त्वरित द्यावी , भुयारी गटार योजना ही त्वरित पूर्ण करावी व रस्ते पूर्ववत दुरुस्त करून मिळावेत. अशा आशयाच्या मागण्या धरणे आंदोलन करणाऱ्या संघटनेकडून करण्यात आले असून बेमुदत धरणे आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे बार्शी शहरांमध्ये खराब रस्ते व अपूर्ण भुयारी गटार व त्यातून निर्माण होणारी धूळ याचा प्रश्न ऐरणीवर असताना या संघटनेने पालिकेच्या गेट समोरच धरणे आंदोलन केल्याने शहरभर आज या आंदोलनाची चर्चा होती.









