पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
एका 17 वषीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. एक महिन्यांपूर्वी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही घटना घडली असून पोलिसांनी सांबरा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
यासंबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात भा.दं.वि. 366(ए), 342, 376 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्या 17 वषीय अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सुरेश कंटेण्णावर (वय 22, रा. सांबरा) या तरुणाला ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नागराज अंबीगेर पुढील तपास करीत आहेत.









