महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात – प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, पराक्रमी चारुदेह, सुचारू, चारूगुप्त, भद्रचारू, चारूचंद्र, विचारू आणि दहावा चारू असे रुक्मिणीला दहा पुत्र झाले. हे सर्वजण कोणत्याही बाबतीत वडिलांहून कमी नव्हते.
यावरी सत्यभामेचें तनय । कथिता झाला योगिवर्य। अनुक्रमें तो नामान्वय । कौरवधुर्य अवधारी । भानु सुभानु आणि स्वर्भानु । प्रभानु भानुमंत चंद्रभानु । बृहद्भानु अतिभानु श्रीभानु। दहावा प्रतिभानु भामेय। यावरी जाम्बवतीचे दश। अपर श्रीकृष्णप्रतिबिंबांश। कथितां त्यांचा नामविशेष । कुरुनरेश अवधारी। जाम्बवतीचा साम्ब प्रथम । सुमित्र पुरुजित् तृतीय नाम । शतजित् सहस्रजित् विजयधाम । चित्रकेतु सातवा । वसुमंत द्रविढ क्रतु । जाम्बवतीचे हे दशसुत। सर्वां गुणीं प्रतापवंत । अपर मूर्त हरि गमती ।
भानू, सुभानू, स्वर्भानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू असे सत्यभामेचे दहा पुत्र होते. जांबवतीचे सांब, सुमित्र, पुरूजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविड आणि क्रतू असे दहा पुत्र होते. हेही श्रीकृष्णांना प्रिय होते.
यावरी नाग्नजितीचे कुमर । कृष्णप्रतापतेजो।़ङ्कुर। यथाक्रमें तो नामोच्चार । सांगे मुनिवर दाहींचा । वीर चंद्र अश्वसेन । चित्रगु वेगवान वृषाभिधान । आम शंकु वसु श्रीमान। कुंतिनामा तेजस्वी । श्रीमान् ऐसें विशेषण । कुंतिनामकाचेंचि पूर्ण । एवं नाग्नजितीसंतान । कृष्णासमान सर्वां गुणीं ।
नाग्नजितीला वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगू, वेगवान, वृष, आम, शंकू, वसू आणि कांतिमान कुंती असे दहा पुत्र झाले.
यावरी कालिन्दीचे जठरिं । दश पुत्रांतें कैठभारि। आपणासमान सर्वां परी । उत्पन्न करी तें ऐका।कनि÷ सर्वांमाजी सोमक । प्रथम श्रुत कवि वृष । वीर सुबाहु भद्रप्रमुख । शांति दर्श पूर्णमास । एकल ऐसें विशेषण। भद्रनामकाचेंचि जाण । यावरी माद्रीचे नंदन । क्रमेंचि श्रवण करिं राया । प्रघोष गात्रवंत सिंहसंकेती । बळ प्रबळ आणि ऊर्ध्वगति। सह ऊर्ज अपराजित महाशक्ति । पुत्रदशक
माद्रीचें ।
कालिंदीचे हे दहा पुत्र होते – धुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि धाकटा सोमक. मद्रदेशाची राजकुमारी लक्ष्मणा हिच्यापासून प्रघोष, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित यांचा जन्म झाला.
यावरी मित्रविंदासंतति । दश पुत्रांचीं नामें नृपति। एकाग्र करूनि चित्तवृत्ति । परिसें सुमति कथितों ते। वृष हल अनिल नामक । गृध्र वर्धन अन्नभक्षक । महीपति पावन वह्निप्रमुख । सर्वां कनि÷ क्षुधिनामा ।
मित्रविंदेचे वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नाद, महाश, पावन, वन्ही आणि क्षुधी हे पुत्र होते.
यावरी भद्राजठरशुक्ति । माजी दश पुत्रांची पंक्ति।
कृष्णवीर्यें पावली व्यक्ति । तें तूं भूपति अवधारिं ।
संग्रामजित बृहत्सेन । शूर अरिजित् आणि प्रहरण। वाम सुभद्र जयवान । आयुष्मान सत्यक पैं ।
ऍड. देवदत्त परुळेकर