सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची संघाने याबाबतची तशी घोषणा केली आहे. त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन तसेच भारत सरकार मार्फत देशभरातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सर्व राज्यात सुरू करण्यात येणार आहे. या निमित्त संघाच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा सकाळी १०.३० वाजता कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे.
या मेळाव्या दरम्यान संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार अपर्णा कोठावळे यांना देण्यात येत असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कळवण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









