दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कर्तव्य बजावून घरी जाणाऱया पोलीस नाईक सचिन कुबल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. यात गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूरला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल़ा
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक सचिन कुबल पोलीस मुख्यालयात पाण्याच्या टँकरवर वाहनचालक होत़े मंगळवारी रात्री कर्तव्य बजावून आपल्या दुचाकीवरुन ते कसोप येथील घरी निघाले होत़े कुर्ली फाटय़ानजीक उतारानजीक पावसहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल़ी या अपघातात ते रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होत़े त्याना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल़े त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे कोल्हापूरला येथे हलवण्यात आल़े मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल़ा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनीतकुमार चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिल़ी अधिक तपास शहर पोलीस करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आह़े









