शिराळा पोलिसात मयुर जाधव याच्यावर गुन्हा दाखल
शिराळा- वार्ताहर
शिराळा येथील बाह्य वळण रोडवर झालेल्या टाटा सुमो व पीक अप अपघात प्रकरणी मयुर मधुकर जाधव रा. बुरंबाड ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघात ग्रस्त तर जखमी जनावरं कुठं आहेत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सवाल काय ? सदर घटना रविवार दिनांक १६ आक्टोंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊ दरम्यान आयटीआय चौकात घडली. याबाबत स.फो. शिवाजी शंकर पाटील (वय ५४) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मयुर जाधव हा महिंद्रा पीकअप (क्रमांक एम एच ०८ डब्ल्यु ३७०१) घेऊन शिराळा बाह्य रस्त्याने इस्लामपूर कडे चालला होता. यावेळी त्याच्या गाडीमध्ये आरटीओ मान्यता प्राप्त वाहतूक परवान्यापेक्षा जास्त जनावरे भरुन जात होता. तर यावेळी इस्लांमपूरकडून येणार्या टाटा सुमो (क्रमांक एम एच २९ ए एल ०८५७) व पीक अप या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हयगयीने वाहन चालवून प्राण्यांची निर्दयतीने वाहतूक प्रकरणी मयुर जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर घटना स्थळारुन मिळालेली माहिती अशी की, मयुर जाधव हा चार बैलांना घेऊन भरधाव वेगाने पेठनाका दिशेने जात होता. यावेळी टाटा सुमो पेठनाक्याकडून शिराळा बाह्यवळणा आयटीआयच्या चौकात आली. यावेळी दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टाटा सुमो गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तर ज्या पिक अप गाडीत चार बैले खेचून भरली होती. त्या पिक अप गाडीची पल्टी झाली होती. यावेळी गाडीतील एका बैलांचे शिंग मोडून गाडीच्या हुडात तसेच अडकले होते. मयुर जाधव याच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी व स्थानिक लोकांनी सदर पीक अप गाडीतून तीन बैल उतरले ते किरकोळ जखमी व अतिशय भयभीत होते. तर चौथ्या बैलाचे शिंग मोडून गाडीच्या हुडात तसेच अडकले होते. लोकांनी सदर चारही बैलांना बाहेर काढले. तर काहींनी इतरत्र त्यांना हाकलून दिले.
सध्या लम्पीच्याआजारामुळे महाराष्ट्रातील जनावरांचे बाजार बंद आहेत. जनावरांच्या वाहतुकीवर बंदी आहे. मग हा मयुर जाधव संगमेश्वर तालुक्यापासून ते शिराळा तालुक्यापर्यंत सदर जनावरे कशासाठी आणली व कुठे नक्की कुठे घेऊन चालला होता. याची खुमासदार चर्चा शिराळा तालुक्यात सुरू आहे . याच बरोबर सदर जखमी बैलांना रेड (ता. शिराळा) येथून पुढे दुसऱ्या वहानांमध्ये घालून घेऊन गेले सदर जखमी बैलांवर उपचार करण्याअगोदरच मुक्या जनावरांना तसेच नक्की कुठे नेहले याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. शिराळा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामध्ये ही आक्षेपार्ह दिसून येत असल्याने अनेक सामाजिक संघटनां व नागरीक यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करत आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार नागनाथ पवार करत








