प्रतिनिधी/ राय
राज्य सरकारच्या कर्मचाऱयांनी अपंग व्यक्तींसाठी असलेले नियम लागू करुन त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातून पाहावे अशी विनंती कुडतरीचे आमदार आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो यांनी केली आहे.
अनेक आरोग्य केंद्रात अशा खास व्यक्तींना चांगली वागणूक मिळत नाही. अशा प्रकारच्या व्यक्तांना चांगल्या आणि प्राधान्यक्रमाने सेवा मिळावी यासाठी सरकारने अपंगासाठीचा एक खास कायदा 1995 साली मंजूर केलेला आहे. मात्र हा कायदा करुन 25 वर्षे झाली तरी या कायद्याच्या तरतुदींची मात्र अंमलबजावणी करण्यात येत नाही हे दुर्देव असल्याचे आमदाराने म्हटलेले आहे.
पणजी आरोग्य केंद्रासह गोव्यात अनेक शहरी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केदांत रॅम्प्स नाहीत. अशामुळे राज्य सरकारची सेवा मिळवू पाहणारे खास व्यक्ती या सोयीअभावी उपचारासाठी इतर खासगी क्लीनिक किंवा इस्पितळात जात असतात.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कर्मचाऱयांनी अपंग व्यक्तींसाठी असलेले नियम लागू करुन त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातून पाहावे आणि त्यांना वैद्यकीय सोयी पुरवाव्यात अशी कुडतरीचे आमदार आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे.









