कोरोनाला बाजूला सारून उत्साहात साजरा झाला नाताळ : कॅम्प परिसरात भगवान येशू जन्माचे देखावे
प्रतिनिधी / बेळगाव
ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण असणारा नाताळ शुक्रवारी बेळगाव शहरासह परिसरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावषी कोरोनामुळे नियमांची अंमलबजावणी करत नाताळ साजरा करण्यात आला. दरवषी ख्रिसमसला सांताक्लॉज लहान मुलांसाठी खेळणी, भेटवस्तू घेऊन येत असतो. परंतु यावषी मात्र
सांताक्लॉज आपल्यासोबत मास्क, सॅनिटायझर घेऊन आला होता. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. हे या सणाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.
गुरुवारी सायंकाळपासूनच नाताळ सणाला सुरूवात झाली. शहरातील महत्त्वाच्या चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. दरवषी मध्यरात्रीपर्यंत ख्रिसमसचा जल्लोष केला जातो. परंतु यावषी कोरोनामुळे तो लवकर करण्यात आला. कॅम्प परिसरात घरांना तसेच चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भगवान येशू यांचे जन्माचे देखावे अनेक ठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे ते पाहण्यासाठी बेळगाव परिसरातील नागरिक कॅम्प येथे आले होते.
विविध चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना
शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत बेळगावच्या विविध चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. बेळगाव डायोसिसचे बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांनी ख्रिस्ती बांधवांना संदेश दिला. यावषी कोरोना महामारीमुळे अनेकांच्या घरातील व्यक्ती दगावल्या आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांना आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घ्या. अनेक गोरगरीब, वंचित लोक आहेत.
त्यांना भेटून त्यांच्या सोबत नाताळाचा आनंद साजरा करून शक्मय होईल तितकी त्यांना मदत करा, यातच खऱया जीवनाचा आनंद आहे, असा संदेश बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिला.
विविध चर्चमध्ये झाल्या सामूहिक प्रार्थना
बेळगावच्या फातिमा कॅथेड्रल चर्चसोबतच इम्यॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्च येथे फादर कॅजिटल डिसुझा, सेंट ऍन्थोनी चर्च येथे फादर विजय मेंडिस, गणेशपूर येथील सेंट जॉन वेबरिस्ट येथे फादर मायकल फर्नांडिस, शहापूर येथील माऊंट कॅरमेल चर्च येथे फादर मायकल वाघ यांनी ख्रिस्ती बांधवांना संदेश देऊन सामूहिक प्रार्थना केली. यासोबतच बॉक्साईट रोड येथील सेंट जोसेफ द वर्कर, मेथॉडिक्स, सेंट मेरीज यासह परिसरातील चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्त विविध फ्लेव्हर्समधील केक व फराळाचे वाटप करण्यात येत होते. विविध ठिकाणी घरांमध्ये पाटर्य़ांचेही आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसचा हा उत्साह नववर्षापर्यंत सुरू असणार आहे.
त्यांना भेटून त्यांच्यासोबत नाताळाचा आनंद साजरा करून शक्मय होईल तितकी त्यांना मदत करा, यातच खऱया जीवनाचा आनंद आहे, असा संदेश बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिला.
विविध चर्चमध्ये झाल्या सामूहिक प्रार्थना
बेळगावच्या फातिमा कॅथेड्रल चर्चसोबतच इम्यॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्च येथे फादर कॅजिटल डिसुझा, सेंट ऍन्थोनी चर्च येथे फादर विजय मेंडिस, गणेशपूर येथील सेंट जॉन वेबरिस्ट येथे फादर मायकल फर्नांडिस, शहापूर येथील माऊंट कॅरमेल चर्च येथे फादर मायकल वाघ यांनी ख्रिस्ती बांधवांना संदेश देऊन सामूहिक प्रार्थना केली. यासोबतच बॉक्साईट रोड येथील सेंट जोसेफ द वर्कर, मेथॉडिक्स, सेंट मेरीज यासह परिसरातील चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्त केक व फराळाचे वाटप करण्यात येत होते. विविध ठिकाणी घरांमध्ये पाटर्य़ांचेही आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसचा हा उत्साह नववर्षापर्यंत सुरू असणार आहे.









